पाणबुडी योजनेचा फेरविचार आवश्‍यक - मनोहर पर्रीकर

यूएनआय
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज नौदलाला पाणबुडी निर्माण योजनेचा फेरविचार करून पुढील तीस वर्षांसाठी त्याची आखणी करण्याची सूचना केली. गेल्या अनेक वर्षांपासून पाणबुडी निर्माणाच्या या कार्यक्रमात सातत्याने विलंब होत आहे.

पाणबुडीसंदर्भात येथे आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात नौदल अधिकाऱ्यांशी मनोहर पर्रीकर यांनी संवाद साधला. ते म्हणाले, 'चोवीस पाणबुड्या तयार करण्याच्या योजनेचा फेरविचार करण्याची गरज असून, पुढील तीस वर्षांसाठी त्याचे नियोजन हवे. सध्याच्या आराखड्यात 2030 पर्यंतचाच विचार केला आहे. मात्र, आपले उद्दिष्ट लक्षात घेऊन आपल्याला 2050 पर्यंतचा विचार करणे आवश्‍यक आहे. यासाठी आपल्याला कौशल्य असलेले मनुष्यबळ आणि विकसित तंत्रज्ञान निर्माण करायचे आहे. यासाठी आपल्याला अधिक पाणबुड्यांची आवश्‍यकता आहे.'' ब्रिटन, रशिया आणि अमेरिकेने शेकडो पाणबुड्या आतापर्यंत तयार केल्याचेही पर्रीकर यांनी निदर्शनास आणून दिले. सहा स्वदेशी पाणबुड्या तयार करण्याच्या प्रकल्पाबाबत बहुतेक तयारी पूर्ण झाली असल्याचे पर्रीकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

Web Title: The submarine must rethink the plan