सरकारी बंगला सोडण्यास सुब्रमण्यम स्वामी राजी!

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी खासदार व सत्तारूढ पक्षाचे सध्याचे टीकाकार सुब्रमण्यम स्वामी दिल्लीतील सरकार निवासस्थान सोडण्यास अखेर राजी झाले.
Subramanian Swamy
Subramanian Swamysakal
Summary

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी खासदार व सत्तारूढ पक्षाचे सध्याचे टीकाकार सुब्रमण्यम स्वामी दिल्लीतील सरकार निवासस्थान सोडण्यास अखेर राजी झाले.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी खासदार व सत्तारूढ पक्षाचे सध्याचे टीकाकार सुब्रमण्यम स्वामी दिल्लीतील सरकार निवासस्थान सोडण्यास अखेर राजी झाले आहेत. त्यांच्या खासगी निवासस्थानीही त्यांच्या झेड श्रेणीच्या सुरक्षेची पूर्ण खातरजमा करून घेतली आहे, असे आश्वासन केंद्र सरकारच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात देण्यात आल्यावर स्वामी यांनी, आपण उद्या (ता. ५) सरकारी बंगला खाली करून देऊ असे मान्य केले.

सुब्रमण्यम स्वामी यांना माजी राज्यसभा खासदार म्हणून झेड श्रेणीची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. केंद्राने उच्च न्यायालयाला सांगितले की स्वामी यांच्या खासगी निवासस्थानीही त्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. त्याबद्दल सुरक्षा यंत्रणाही समाधानी आहेत. स्वामी यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ यंदा एप्रिलमध्ये संपला व त्यानंतर त्यांनी भाजपवर टीका सुरू केल्याने त्यांना सरकारी निवासस्थान कायम ठएवण्याची परवानगी मिळणार नाही ही अटकळ खरी ठरली.

स्वामींची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील जयंत मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की माजी खासदाराला बंगला रिकामा करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली जाते. त्यानंतर तेव्हा केंद्राने त्यांच्या घरी पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली जाईल असे आश्वासन देतानाच, बंगला त्वरित सोडावा लागेल असे बजावण्याची भूमिका घेतली. यापूर्वी आश्वासन देऊनही, केंद्राने त्यांच्या खासगी निवासस्थानी कोणतीही सुरक्षा प्रदान केली नाही असा आरोप करून स्वामी यांनी मोदी सरकारच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com