दिल्लीचे मुख्यमंत्री 'नक्षलवादी'- सुब्रमण्यम स्वामी

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 'नक्षलवादी' असल्याचे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर, देशातील चार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, पी. विजयन आणि एच. डी. कुमारस्वामी हे केजरीवाल यांचे समर्थन का करत आहेत हे न समजण्यासारखे आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना स्वामी यांनी केजरीवाल यांना राजकारणातील काहीच समजत नसल्याचा आरोपही केला आहे. अण्णा हजारेंच्या खांद्यावर चढून प्रसिद्धी मिळवून सत्ता मिळवली परंतु, त्यानंतर अण्णा हजारेंनाच केजरावालांनी दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले. केजरीवाल हे ४२० आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 'नक्षलवादी' असल्याचे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर, देशातील चार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, पी. विजयन आणि एच. डी. कुमारस्वामी हे केजरीवाल यांचे समर्थन का करत आहेत हे न समजण्यासारखे आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना स्वामी यांनी केजरीवाल यांना राजकारणातील काहीच समजत नसल्याचा आरोपही केला आहे. अण्णा हजारेंच्या खांद्यावर चढून प्रसिद्धी मिळवून सत्ता मिळवली परंतु, त्यानंतर अण्णा हजारेंनाच केजरावालांनी दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले. केजरीवाल हे ४२० आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

शनिवारी सांयकाळी चार राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी आंदोलन करत असलेल्या केजरीवाल यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना आता जाऊ देण्यात आले नाही. त्यानंतर या सर्व मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी राजभवन येथे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या विरोधात उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे.

दरम्यान, दिल्ली सरकारच्या विविध प्रश्नांच्या मुद्यावर निती आयोगाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकी दरम्यान या चारही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्याचबरोबर, त्यांनी पंतप्रधान मोदींशी दिल्ली सरकारच्या समस्यांबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी टि्वटवर सांगितले, की मी आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांसह आम्ही आज माननीय पंतप्रधान मोदींशी दिल्ली सरकारच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विनंती केली आहे.

दिल्ली सरकारच्या विविध महत्वपूर्ण मुद्यांवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आवाहन केले. तसेच या बैठकीत केजरीवाल यांच्याऐवजी नायब राज्यपालांनी उपस्थिती लावली. त्यावर केजरीवाल यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया नोंदवली.

ते म्हणाले, संविधानच्या कोणत्या नियमांतर्गतस नायब राज्यपालांना मुख्यमंत्र्यांच्या जागी बसण्याची परवानगी देण्यात आली. निती आयोगाच्या बैठकीला मी त्यांना माझ्याऐवजी उपस्थित राहण्याची परवानगी दिली नाही.

 

Web Title: Subramanian Swamy calls Delhi CM Naxalite