Odisha Train Accident: भाजप नेत्यानेच केली रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; राजकीय गोटात खळबळ

बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे.
Odisha Train Accident
Odisha Train AccidentSakal

Odisha Train Accident: बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अजूनही मदतकार्य सुरू आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही घटनास्थळी पोहोचले होते आणि सर्व अधिकाऱ्यांकडून अपघाताची माहिती घेतली.

विरोधक तुमच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या प्रकारच्या घटनेत मानवी संवेदनशीलता खूप महत्त्वाची आहे. मी म्हणेन की प्रथम लक्ष बचाव आणि मदतकार्य यावर आहे.

घटनास्थळाचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेल्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना या अपघातामागे षडयंत्र असू शकते का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीनंतरच याबाबत काही सांगता येईल, असे सांगितले. (Subramanian Swamy demands rail minister's ashwini vaishnaw resignation over Odisha train accident)

घटनास्थळी पोहोचल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, अपघाताच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे, जी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल. सध्या संपूर्ण लक्ष बचाव कार्यावर आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनाही अपघाताची चौकशी करण्यास सांगितले आहे.

या घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. यातच आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ट्वीट करत ते म्हणाले की, ''आपल्याला माहित आहे की, वेगाने येणारी रेल्वे जी रुळावरून घसरते आणि येणार्‍या रेल्वेला टक्कर देते त्या रुळांवरुन वेगाने येणाऱ्या रेल्वेला कधीही परवानगी देऊ नये कारण रेल्वे ट्रॅक हे कमी वेगाने येणाऱ्या रेल्वेसाठी असतात. (rail minister's ashwini vaishnaw resignation)

Odisha Train Accident
Odisha Train Accident: मृत्यूचं थैमान अन् प्रेताच्या ढिगाऱ्यात सुरू असलेलं मदतकार्य, पहा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ

त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या परवानगीची वाट न पाहता राजीनामा द्यावा. मोदी अर्थातच अकार्यक्षम, किंवा कार्यक्षम पण अयोग्य असलेल्या शिष्यांना मंत्री म्हणून नियुक्त करण्यासाठी जगप्रसिद्ध आहेत.

आता त्यांना किंमत मोजावी लागत आहे. अकार्यक्षम पण निष्ठावान शिष्याचे आणखी एक प्रमुख उदाहरण मणिपूर आहे.''

जखमींसाठी 60 हून अधिक रुग्णवाहिका:

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. बचाव कार्यात हवाई दल आणि लष्करासह एनडीआरएफच्या पथकांचा सहभाग आहे. ओडिशा सरकारचे विशेष बचाव कार्य पथकही तैनात करण्यात आले आहे.

अपघातातील जखमींसाठी 60 हून अधिक रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने चार रुग्णालयांमध्ये उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. अपघातात बळी गेलेले बहुतांश बंगालचे रहिवासी आहेत. (Odisha Train Accident)

Odisha Train Accident
Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com