इंधन दरवाढ ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी; भाजप नेत्याचा घरचा आहेर

इंधन दरवाढ ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी; भाजप नेत्याचा घरचा आहेर

गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव जवळपास दररोजच वाढत आहेत. सरासरी 80 पैशांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असून आतापर्यंत घसघशीत अशा नऊ रुपयांनी इंधन महागले आहे. देशात पेट्रोलचे दर तब्बल 120 रुपयांच्या आसपास पोहोचले असून अत्यंत भीषण अशा महागाईला देश तोंड देतो आहे. देशातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सरकारने हे दर वाढवण्यास सुरुवात केली आहे. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत टीका केली आहे. (Subramanian Swamy)

इंधन दरवाढ ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी; भाजप नेत्याचा घरचा आहेर
Petrol Rate : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ! जाणून घ्या नवे दर

त्यांनी म्हटलंय की, पेट्रोल-डिझेल आणि केरोसीनच्या दरात होत असणारी ही दैनंदिन वाढ म्हणजे अर्थ मंत्रालयाची बौद्धीक दिवाळखोरी आहे. तसेच सरकारचं हे कृत्य देशविरोधी असल्याचाही ठपकाही त्यांनी ठेवला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, पेट्रोल-डिझेल आणि केरोसीनच्या दरात दर दिवशी होणारी वाढ पाहता बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे. अशा प्रकारची दरवाढ करत राहणं ही एकप्रकारची बौद्धीक दिवाळखोरीच असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच ही कृती देशविरोधी देखील आहे. या किंमती वाढवून अर्थसंकल्पातील तूट भरुन काढणं ही सरकारचीच अक्षमता असल्याचं त्यांनी म्हटलंय.

इंधन दरवाढ ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी; भाजप नेत्याचा घरचा आहेर
Share Market : आज कसा असेल शेअर बाजाराचा मूड?

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Prices) वाढ सुरूच ठेवली आहे. आज मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांची वाढ झाली होती. जोपर्यंत तोटा भरून निघत नाही तोपर्यंत कंपन्या इंधनाचे दर वाढवू शकतात. (Check Today's Petrol Diesel Price Updates)

तेल कंपन्यांनी राजधानी दिल्लीत (Delhi) पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांची वाढ केली आहे. दिल्लीत आता पेट्रोल 104.61 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे, तर डिझेल सुमारे 96 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबईत (Mumbai)पेट्रोल 119.67 रुपये तर डिझेल 104 रुपयांच्या जवळपास विक्री करत आहे. कंपन्यांनी 15 दिवसांत 13 वेळा भाववाढ केली असून आतापर्यंत 9.40 रुपयांनी भावात वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com