esakal | 'त्यापेक्षा असं करा'; मोदी स्टेडीयमच्या नाव बदलाबाबत सुब्रमण्यम स्वामींचा सरकारला अजब सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

swamy.

देशातील कुठलाही विषय असो त्यावर अगदी ठामपणे आपलं मत मांडणारे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी आता त्यांच्या एका नव्या ट्विटमुळे चर्चेत आले आहेत.

'त्यापेक्षा असं करा'; मोदी स्टेडीयमच्या नाव बदलाबाबत सुब्रमण्यम स्वामींचा सरकारला अजब सल्ला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील कुठलाही विषय असो त्यावर अगदी ठामपणे आपलं मत मांडणारे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी आता त्यांच्या एका नव्या ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. तसे ते नेहमीच आपल्या वेगवेगळ्या सल्ल्यांसाठी आणि मतांसाठी चर्चेत असतात. मात्र, यावेळी सुब्रमण्यम स्वामींनी सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमचं नाव बदलून नरेंद्र मोदींचं नाव दिलं जाण्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

हेही वाचा - 'इंधनदरातील वाढ हा तर थंडीचा परिणाम'; पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं अजब विधान

यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, गुजरातचा जावई असल्या कारणाने अनेक गुजरात्यांनी त्यांच्याकडे या नामकरणावरुन तक्रार केली आहे. अनेकजण सरदार पटेल स्टेडीयमचं नाव बदललं जाण्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सल्ला देताना त्यांनी पुढे म्हटलंय की, या नामबदलामुळे झालेलं नुकसान एकाप्रकारे कमी करता येऊ शकतं. राज्यातील सरकार असं म्हणू शकतं की स्टेडीयमचं नाव बदलण्याबाबत नरेंद्र मोदींशी सल्लामसलत केली गेली नव्हती त्यामुळे हा नाव बदलण्याचा निर्णय मागे घेतला जाऊ शकतो. 

सुब्रमण्यम स्वामी भलेही भारतीय जनता पक्षाशी निगडीत असो मात्र ते आपल्या मतांबाबत अत्यंत परखड मानले जातात. अशावेळी ते पक्षाची अथवा पक्षश्रेष्ठींचीही परवा करत नाहीत. सुब्रमण्यम स्वामी भाजपचे राज्यसभेचे खासदार असून त्यांनी अनेकवेळा केंद्रातील मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर कडाडून टीका देखील केली आहे. गेल्या 24 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जगातील सर्वांत मोठ्या स्टेडीयमचं उद्घाटन केलं. याआधी हे स्टेडीयम सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयम या नावाने ओळखलं जायचं. मात्र, आता ते नाव बदलून याचं नाव नरेंद्र मोदी स्टेडीयम केलं गेलं आहे. गुजरात सरकारच्या या निर्णयावर देशातील अनेक लोकांनी आपली नाराजी आणि राग व्यक्त केला आहे. 

loading image