esakal | 'इंधनदरातील वाढ हा तर थंडीचा परिणाम'; पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं अजब विधान

बोलून बातमी शोधा

dharmendra pradhan}

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या  किंमतींनी भारतामध्ये उच्चांक गाठला आहे. आजवरच्या इतिहासातील ही ऐतिहासिक अशी सर्वोच्च वाढ आहे.

'इंधनदरातील वाढ हा तर थंडीचा परिणाम'; पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं अजब विधान
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वाराणसी : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या  किंमतींनी भारतामध्ये उच्चांक गाठला आहे. आजवरच्या इतिहासातील ही ऐतिहासिक अशी सर्वोच्च वाढ आहे. दिवसेंदिवस वाढत्या किंमतींमुळे सामान्य नागरिक हैराण झाले असून इंधनाच्या किंमती कमी होण्याचे काही चिन्हे दिसत नाहीयेत. याबाबत केंद्र सरकारला प्रश्न विचारले जात असून त्याबाबतची समाधानकारक अशी उत्तरे मिळत नाहीयेत. या दरम्यानच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेस पात्र ठरलं आहे. देशभरातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं एक विचित्र असं वक्तव्य समोर आलं आहे. दोन दिवसाच्या वाराणसी दौऱ्यावर असणाऱ्या धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलंय की, थंडीमुळे पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत. जसजशी थंडी कमी होईल, तसतशा या किंमती कमी होत जातील.

हेही वाचा - 'भारतीय इंधनावर देतात 260% टॅक्स'; दरवाढीविरोधात शशी थरुरांचं हटके आंदोलन

जागतिक बाजारात वाढलेल्या इंधनाच्या किंमतीचा परिणाम ग्राहकांवर झाला आहे. हिवाळ्यात पेट्रोलची मागणी वाढते, त्यामुळे किंमती वाढतात. हिवाळा गेला की किंमती घसरतील. हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकरण आहे. हिवाळ्यात वाढलेल्या मागणीमुळे किंमती देखील वाढल्या आहेत. हिवाळ्यानंतर या किंमती कमी होतील, असं वक्तव्य पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. 

वाढत्या किंमतींमागे जागतिक बाजार
धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलंय की पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतींमधील उसळीमागे आंतरराष्ट्रीय कारण आहे. कारण आता इंधनांची मागणी जास्त आहे. त्यामुळे सामान्य जनतेला थोडा त्रास सोसावा लागत आहे. थंडीचा ऋतू कमी होताच किंमती देखील कमी होतील. 

हेही वाचा - रेल्वेत महिलेकडे 100 जिलेटिनच्या कांड्या; पोलिसांना सांगितले, कशासाठी आणल्या? 
विरोधकांचा हल्लाबोल
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरुन देशातील सामान्य नागरिकांच्या बाजूने विरोधकांनी देखील हल्लाबोल केला आहे. रस्त्यावर उतरुन तसेच सभागृहात देखील याबाबतचा विरोध विरोधकांकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. या दरम्यानच पेट्रोलियम मंत्र्यांकडून आलेल्या या विचित्र अशा वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली जात असून ते चर्चेस पात्र ठरलं आहे.