नवीन वर्षाआरंभी मोदी सरकारकडून गुड न्यूज 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जानेवारी 2019

या कारणांमुळे कपात 
जागतिक बाजारपेठेत "एलपीजी' दरात सुरू असलेली घसरण, तसेच चलनबाजारात डॉलरच्या तुलनेत सावरलेला रुपया यांमुळे सिलिंडर दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने म्हटले आहे. 

नवी दिल्ली छ केंद्र सरकारने सोमवारी घरगुती वापराच्या (अनुदानित) सिलिंडर दरात 5 रुपये 91 पैशांची कपात करून सर्वसामान्यांना नवीन वर्षाची भेट दिली. याबरोबरच विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 120.50 रुपयांची कपात करण्यात आली असून, आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, ताज्या कपातीनंतर राजधानी दिल्लीत अनुदानित सिंलिंडरचा दर 494 रुपये 99 पैशांवर आला असून, यापूर्वी तो 500 रुपये 90 पैसे होता. चालू महिन्यात केलेली ही दुसरी कपात ठरली. यापूर्वी 1 डिसेंबरला अनुदानित सिलिंडर दरात 6 रुपये 52 पैशांची करण्यात आली होती. 

विनाअनुदानित सिलिंडर 120 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला असून, त्याचा दर आता 689 रुपयांवर आला आहे. 1 डिसेंबरला त्यात 133 रुपयांची कपात करण्यात आली होती. दरम्यान, जून ते नोव्हेंबर या सलग सहा महिन्यांत सिलिंडर दरात वाढ करण्यात आली होती. चालू महिन्यात त्यात दोनदा झालेल्या कपातीमुळे सिलिंडर एकूण 14 रुपये 13 पैशांनी स्वस्त झाल्याचे स्पष्ट झाले. 

दरम्यान, नवीन दरांनुसार, अनुदानित सिलिंडरसाठी सरकारकडून ग्राहकांना मिळणारी रक्कम जानेवारी महिन्यापासून 194 रुपये राहील. 

या कारणांमुळे कपात 
जागतिक बाजारपेठेत "एलपीजी' दरात सुरू असलेली घसरण, तसेच चलनबाजारात डॉलरच्या तुलनेत सावरलेला रुपया यांमुळे सिलिंडर दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने म्हटले आहे. 

Web Title: Subsidised LPG Price Slashed by Rs 5.91 Non-subsidised LPG Rate Cut by Rs 120.50