CAA : बांगलादेशी निर्वासित मायदेशी परतू लागले!

वृत्तसंस्था
शनिवार, 25 जानेवारी 2020

अनधिकृत बांगलादेशी निर्वासितांनी भारत सोडून पुन्हा मायदेशी जाण्यास सुरुवात केली असून, जानेवारी महिन्याभरात आम्ही 268 अनधिकृत बांगलादेशी निर्वासितांना पकडले आहे,

कोलकता : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत बांगलादेशी निर्वासितांच्या मायदेशी परतण्याच्या संख्येत महिनाभरात वाढ झाल्याचा दावा सीमा सुरक्षा दलाकडून (बीएसएफ) शुक्रवारी (ता.24) करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की सीएए लागू झाल्यानंतर भारतात अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींच्या घरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी बांगलादेशी निर्वासित मायदेशी परतण्याच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. 

- हिंदुत्व चळवळीला राज्यघटना अमान्य; शशी थरूर यांचे वक्तव्य

बीएसएफचे महासंचालक (दक्षिण बंगाल सीमा) वाय. के. खुरानिया यांनी सांगितले, की अनधिकृत बांगलादेशी निर्वासितांनी भारत सोडून पुन्हा मायदेशी जाण्यास सुरुवात केली असून, जानेवारी महिन्याभरात आम्ही 268 अनधिकृत बांगलादेशी निर्वासितांना पकडले आहे, त्यांपैकी बहुतेक जण बांगलादेशात परतण्याच्या प्रयत्नात होते.

- डागाळलेल्यांना उमेदवारी नको, न्यायालयाने निर्देश द्यावेत; आयोगाची विनंती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Substantial Increase In Outflow Of Illegal Bangladeshi Migrants Post CAA report BSF