त्सुनामीने घरं उद्ध्वस्त, आर्थिक अडचण, परिस्थितीवर मात करत दाखवला करिष्मा; शेतकऱ्याच्या दोन्ही मुली बनल्या IAS आणि IPS अधिकारी

Success Story: त्सुनामीच्या भीषण आपत्तीत घरं उद्ध्वस्त झाली, मात्र शेतकरी कुटुंबातील मुलींनी परिस्थितीवर मात करत आयएएस व आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.
Success Story  farmer daughters become IAS-IPS officer

Success Story farmer daughters become IAS-IPS officer

ESakal

Updated on: 

घरची परिस्थिती कशीही असली तरीही प्रत्येकाची जिद्द आणि चिकाटी त्यांना त्यांच्या यशापर्यंत पोहोचवतेच. अशीच एक यशोगाथा तामिळनाडूतील एका शेतकरी कुटुंबाची आणि त्यांच्या दोन मुलींची समोर आली आहे. एकावेळी समुद्राच्या लाटांनी यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, परिणामी त्यांच्या आर्थिक अडचणीही वाढल्या. पण या शेतकरी कुटुंबातील दोन मुलींचं धैर्य होतं आणि वेगळे साध्य करण्याचे स्वप्न होते. कठीण परिस्थिती आणि आपल्या वडिलांचा संघर्ष हीच शक्ती मानून, दोन्ही मुली आयपीएस आणि आयएएस अधिकारी झाल्या आहेत.

Loading content, please wait...