
देशात पहिल्यांदाच 5G कॉलची IIT मद्रासमध्ये यशस्वी चाचणी, पाहा VIDEO
आज भारतातील पहिल्यांदाच IIT मद्रास येथे 5G कॉलची यशस्वी चाचणी घेण्यात आली, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, आयआयटी मद्रासमध्ये 5जी कॉलची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. संपूर्ण नेटवर्क भारतातच डिझाइन आणि विकसित केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले
ट्विटरवर याबद्दल माहिती देताना वैष्णवने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे ज्यामध्ये ते 5G चे परिक्षण केलेल्या टीमसोबत दिसत आहेत. वैष्णव यांच्यासह संपूर्ण टीम या व्हिडिओमध्ये आनंद साजरा करताना दिसत आहेत. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आत्मनिर्भर 5G आयआयटी मद्रासमध्ये 5जी कॉलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संपूर्ण नेटवर्क भारतातच डिझाइन आणि विकसित केले गेले असल्याचे त्यांनी सांगितल.
हेही वाचा: पुणे : भाटघर धरणात पाच महिलांचा बुडून मृत्यू
दरम्यान 5G टेस्ट बेड एकूण 8 संस्थांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. आयआयटी मद्रासच्या नेतृत्वाखाली ते विकसित करण्यात आले आहे. IT दिल्ली, IIT हैदराबाद, IIT बॉम्बे, IIT कानपूर, IISc बंगलोर, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) आणि सेंटर ऑफ एक्सलन्स इन वायरलेस टेक्नॉलॉजी (CEWiT) या प्रोजेक्टमध्ये समावेश आहे.
हेही वाचा: भारताची निखात झरीन ठरली नवी बॉक्सिंग चॅम्पियन!
Web Title: Successfully Tested 5g Call At Iit Madras Ashwini Vaishnaw Says Network Designed Developed In India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..