संकटातल्या साखर उद्योगाला हवा सरकारचा आधार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 मार्च 2018

सन 2015 साली या प्रकारची मागणी करीत भारतातील साखर उत्पादनाला संरक्षण देण्यात आले होते.2003 2004 तसेच 2007 / 2008 या वर्षाप्रमाणे बफर स्टॉक करावा अशी मागणीही साखर महासंघाने केली आहे

मुंबई - साखरेच्या उत्पादनाने पुन्हा एकदा विक्रमी आकडे गाठले असल्याने संकटात सापडलेल्यांना हात दया अशी मागणी महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील बडया साखर उत्पादकांची स्थिती शोचनीय झाली असून आयात बंद करून निर्यातीला परवानगी दया असेही गाऱ्हाणे आहे.

साखर महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात तातडीने बैठक घ्यावी ,साखर कारखानदारांना दिलासा दयावा अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.  साखरेवरील निर्यात शुल्क शून्य करावे, आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत किंमतीत एकवाक्‍यता आणावी अशी मागणी महासंघाने केली आहे.

सन 2015 साली या प्रकारची मागणी करीत भारतातील साखर उत्पादनाला संरक्षण देण्यात आले होते.2003 2004 तसेच 2007 / 2008 या वर्षाप्रमाणे बफर स्टॉक करावा अशी मागणीही साखर महासंघाने केली आहे. 

Web Title: sugar industry needs government help