Sugar Production : साखर उत्पादनात १८ टक्क्यांची घट; सहकारी साखर कारखाना महासंघाची माहिती
Sugar Industry : देशातील साखर उत्पादनात तब्बल १८ टक्क्यांची घट झाली असून, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये सर्वाधिक उत्पादन कमी झाले आहे. २०२३-२४ मध्ये ३१५.४० लाख मेट्रिक टन उत्पादन होते, तर यंदा ते २५७.४० लाखांवर आले आहे.
नवी दिल्ली : देशातील साखर उत्पादनात १८ टक्क्यांनी घट झाल्याचे राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने म्हटले आहे. यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या राज्यांत साखर उत्पादन सर्वांत कमी झाले आहे.