#SugarcaneRateIssue ऊस दर प्रश्नी बेळगावात जिल्हाधिकाऱ्यांना घेराआे

 #SugarcaneRateIssue ऊस दर प्रश्नी बेळगावात जिल्हाधिकाऱ्यांना घेराआे

बेळगाव - थकीत ऊस बिल मिळाल्याशिवाय चालू वर्षात कारखाने सुरु न करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्य़ांना घेराआे घातला. जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी यांना त्यावर स्पष्ट भुमिका घेता आली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात काहीकाळ गोंधळ उडाला. 

थकीत ऊस बिल आणि चालू आर्थिक वर्षात ऊस दर ठरवण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज (ता.14) बैठक आयोजिली होती. त्यासाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी थकीत बिलासाठी किती वर्षे प्रतिक्षा करायची. 14 दिवसांत ऊस बिल अदा करण्याची सूचना आणि कायदा असताना 3 ते 4 वर्षे बिले थकीत ठेवली जात आहेत. त्याला सर्वस्वी जिल्हाधिकारीच जबाबदार आहे. कारखाने आमदार, खासदार व मंत्र्यांच्या ताब्यामध्ये आहे. त्यामुळे याविरोधात कारवाई हाती घेताना जिल्हाधिकाऱ्यांना अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. आता आम्ही गप्प बसणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरून गुन्हा दाखल करणार आहोत, असा इशारा उपस्थित शेतकऱ्यांनी दिला. 

थकीत ऊस बिलाचा विषय 2013 पासून गाजतो आहे. कित्येक सभा झाल्या. दाखल्याची विचारणा झाली. प्रत्येकवेळी 100 ते 150 रुपये खर्च करून झेरॉक्‍स आणल्या. त्याचे काय झाले माहिती नाही. पण, बिले मिळाली नाहीत. असे प्रश्न शेतकऱ्यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com