आत्महत्येचे फेसबुक लाइव्ह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

आग्रा : स्वतःच्या आत्महत्येचे फेसबुक लाइव्ह करत एका तरूणाने आपली जीवनयात्रा संपवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी आग्रा येथे घडला. मुन्ना कुमार असे या तरूणाचे नाव असून, सैन्य दलातील भरती प्रक्रियेत अपयश आल्यामुळे तो तणावग्रस्त झाला होता. या तणावातूनच त्याने आत्महत्या केली. आग्रा येथील शांतीनगर भागात राहणारा मुन्ना कुमार याने बीएससी पदवी  घेतली होती.

फेसबुकवरून हे भयानक कृत्य पाहणाऱ्या मित्रांची अवस्था दयनीय झाली होती. अनेकांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणिही त्याला थांबवू शकले नाही. वयाच्या 17 वर्षापासून तो सैन्य भरतीसाठी प्रयत्न करत होता. मात्र, त्याला यश मिळत नव्हते. भरतीची वयोमर्यादा संपत चालल्यामुळे त्याच्यावरील ताण वाढत होता. यातूनच त्याने मंगळवारी रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतर फाशी घेऊन स्वतःचे जिवन संपवले. असे करताना त्याने फेसबूक लाइव्ह सुरू केले होते.

मुन्ना कुमार याच्या मृतदेहा जवळ दोन पाने सापडली आहेत. त्याच्यावर त्याच्या संघर्षाची तपशीलवार माहिती लिहीली आहे. या पानांवर पालकांची माफी मागून शेवटी 'जय हिंद' असे लिहीले आहे.
  
तरूण मुलाच्या मृत्यूमुळे मुन्नाचे कुटुंबीय उद्धवस्त झाले आहे. मुन्नाचा लहान भाऊ विकास कुमार म्हणाला, "माझा भाऊ शहीद भगत सिंहांच्या विचारांनी प्रेरीत झाला होता. सैन्य दलात भरती होण्याची त्याची तिव्र इच्छा होती. रात्री आम्ही सर्वांनी सोबत जेवन केले. तेव्हा तो एकदम नॉर्मल होता. तो असे काही करेल असे कोणालाही वाटले नव्हते." 

पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवीला असून, फेसबूक वरील व्हिडिओच्या माध्यमातून तपास करत आहेत.

Web Title: Suicide on facebook live