Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

Savings Scheme : मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी 'सुकन्या समृद्धी योजना' ही अत्यंत फायदेशीर ठरते. काही विशेष नियमांच्या आधारे पालक तिन्ही मुलींसाठी मोठा फंड कसा उभा करू शकतात, याबाबत जाणून घ्या सविस्तर.
Get big financial benefit by investing in the name of three girls

Get big financial benefit by investing in the name of three girls

Sakal

Updated on: 

केंद्र सरकारच्या लोकप्रिय अल्प बचत योजनांपैकी एक असलेल्या 'सुकन्या समृद्धी योजना' (SSY) बाबत पालकांमध्ये नेहमीच मोठी उत्सुकता असते. सामान्यत: या योजनेचा लाभ एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी घेता येतो, परंतु काही विशिष्ट नियमांनुसार जर पहिल्या किंवा दुसऱ्या प्रसूतीमध्ये जुळ्या किंवा तिजोरा (तिसर्‍या प्रसूतीत अपत्ये) मुली झाल्या तर नियमांच्या अधीन राहून तीन मुलींच्या नावानेही खाती उघडता येतात. योग्य आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून या योजनेतून मोठा फंड उभा राहू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com