देशाच्या शांततेसाठी सिद्धूंनी पाकिस्तानातच राहावे : बादल

Sukhbir Badal taunts Navjot Singh Sidhu says stay in Pak for peace in country
Sukhbir Badal taunts Navjot Singh Sidhu says stay in Pak for peace in country

नवी दिल्ली : 'पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ' (पीटीआय) या इम्रान खान यांच्या पक्षाने पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविल्या. त्यामुळे इम्रान खान हेच पंतप्रधानपदी विराजमान होतील हे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानला जाणार असल्याची शक्यता आहे. या उपस्थितीवरून अकाली दलाचे सुखबीरसिंग बादल यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ''सिद्धू पाकिस्तानात जाऊन तिथेच राहिले तर पंजाबसह देशात शांतता नांदेल''. 

इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी सिद्धू, सुनील गावस्कर, कपिल देव यांच्यासह काही क्रिकेटपट्टूंना आमंत्रण देण्यात आले होते. सिद्धू यांनी इम्रान खान यांचे निमंत्रण स्वीकारले असून, ते पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिद्धू यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच आता सिद्धू यांच्या या पाकिस्तानभेटीवर बादल यांनी टीका केली. ते म्हणाले, ''सिद्धू उद्या, परवा काय करतील, सांगता यायचे नाही. तसेच ते जे काही करतील त्याचे परिणाम आणि नुकसान काय होईल, हेही सांगता यायचे नाही. मला वाटते, की ते कायमचेच पाकिस्तानात राहिले तर पंजाबमध्ये आणि देशात शांतता नांदेल.'' 

दरम्यान, सिद्धू यांनी आमंत्रण स्वीकारल्यानंतर सुनील गावस्कर यांनी केंद्र सरकारशी विचारविनमय करूनच आपण पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com