'सुखोई' अपघातातील दोन वैमानिकांचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जून 2017

नवी दिल्ली : आसाममधील तेजपूर विमानतळावरून आकाशामध्ये झेपावलेले सुखोई विमान कोसळून झालेल्या अपघातातील दोन जखमी वैमानिकांचा आज मृत्यू झाल्याची माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नवी दिल्ली : आसाममधील तेजपूर विमानतळावरून आकाशामध्ये झेपावलेले सुखोई विमान कोसळून झालेल्या अपघातातील दोन जखमी वैमानिकांचा आज मृत्यू झाल्याची माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

स्क्वाड्रन लीडर डी. पंकज (36) आणि फ्लाईट लेफ्टनंट अच्युदेव (26) अशी मरण पावलेल्या वैमानिकांची नावे आहेत. अपघातग्रस्त "सुखोई-36 एमकेआय' विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशातील घनदाट जंगलामध्ये सापडले होते. यासाठी तीन दिवस शोधमोहीम राबविण्यात आली होता.

तेजपूरमधील हवाईतळावरून 23 मे रोजी साडेदहाच्या सुमारास या विमानाने उड्डाण करताच साडेअकरा वाजता ते रडारवरून अदृश्‍य झाले होते.

Web Title: sukhoi accident pilots die