

A poultry farm in Sultanpur where over 140 chickens reportedly died due to extreme DJ noise during a wedding procession
esakal
Sultanpur DJ Noise Incident: उत्तरप्रदेशातील सुलतानपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लग्नाच्या वरातीतील डीजेच्या दणादणाटामुळे शेकडो कोंबड्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. यामुळे एका सामान्य कुक्कुटपालन व्यावसायिकाची उपजीविकाच उद्ध्वस्त झाली आहे. वरातीत वाजत असलेल्या डीजेतून निघालेला"कानठळ्या बसवणारा" आवाज त्या मुक्या कोंबड्यांना सहन झाला नाही. अवघ्या काही क्षणांतच १४० कोंबड्या प्रचंड भीतीमुळे आणि गोंधळामुळे मृत्युमुखी पडल्या. या हृदयद्रावक घटनेने आता कायदेशीर वळण घेतले आहे.