सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विष प्रयोगामुळे

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या वकीलांनी हा मृत्यू विष प्रयोगामुळे झाल्याचा दावा न्यायालयात केला आहे. तसेच या प्रकरणात आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचाही प्रकार असल्याचे न्यायालयाला सांगितले.

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या वकीलांनी हा मृत्यू विष प्रयोगामुळे झाल्याचा दावा न्यायालयात केला आहे. तसेच या प्रकरणात आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचाही प्रकार असल्याचे न्यायालयाला सांगितले.

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाची सुनावनी दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात झाली. या प्रकरणातील आरोपी व कॉंग्रेस पक्षाचे खासदार शशी थरूर यांना समन्स पाठविण्याचा आदेश पटियाला हाऊस न्यायालयाने 5 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांनी हा आदेश दिला. दरम्यान दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे, की सुनंदा पुष्कर यांनी मृत्यूपुर्वी ८ जानेवारी २०१४ ला शशी थरूर यांना ई-मेल केला होता. त्यात त्यांनी आपल्याला जगण्याची इच्छा राहिली नाही. मला मरायचे आहे. मला कुठल्याही चौकशीची पर्वा नाही. असे थरूर यांना केलेल्या ई-मेलमध्ये म्हटले होते.

सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडताना, सुनंदा यांचे हे तिसरे लग्न होते. सुनंदा यांनी मृत्यूपूर्वी दोन दिवस आधी कविता लिहीली होती. कवितेवरून त्या तणावत होत्या याचा अंदाज येतो आणि न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातही त्यांनी लिहिलेल्या कवितेचा ही उल्लेख केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनवाई 5 जूनला होणार आहे.

Web Title: sunanda pushkar suicide case