Delhi Lok Sabha Election 2024 : 'आप'च्या प्रचारासाठी सुनीता केजरीवाल मैदानात! दिल्लीतील मतदारसंघात करणार रोड शो

Delhi Lok Sabha Election 2024 : गेल्या 21 मार्चला मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आपच्या प्रचाराची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न होता.
sunita kejriwal campaign for aap candidates lok sabha election 2024 Marathi politics news
sunita kejriwal campaign for aap candidates lok sabha election 2024 Marathi politics news

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीमध्ये आपच्या उमेदवारांचा प्रचार कोण करणार, या प्रश्नांची उत्तरे आता मिळू लागले असून आपचे स्टार प्रचारक म्हणून सुनीता केजरीवाल आता रणमैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या 21 मार्चला मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आपच्या प्रचाराची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न होता. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पंजाबच्या बाहेर पडता येणार नाही. आपचे पुढील नेतृत्व सुनीता केजरीवाल यांच्याकडे राहील, असे स्पष्ट झाले आहे. इंडीया आघाडीच्या दिल्ली व रांची येथे झालेल्या रॅलीमध्येही सुनीता केजरीवाल यांनी हजेरी लावली होती व भाषण करून राष्ट्रीय राजकारणासाठी तयार असल्याचे संकेत दिले होते.

येत्या 25 मे रोजी दिल्लीत मतदान होणार आहे. अजूनही एक महिना मतदानाला शिल्लक असताना सुनीता केजरीवाल उद्या, शनिवारला पूर्व दिल्ली मतदारसंघात रोड शो करणार आहेत. या मतदारसंघात आपचे कुलदीप कुमार उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे येत्या रविवारी त्या पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात रोड शो करणार असल्याचे दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी मार्लेना यांनी सांगितले.

या मतदारसंघात आपचे महाबल मिश्रा उमेदवार आहेत. या दोन रोड शोला कसा प्रतिसाद मिळतो, यावर आपच्या प्रचाराची रणनीती ठरणार आहे. या रोड शोला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्यास सुनीता केजरीवाल यांचे गुजरात, हरियाणा, पंजाब व दिल्लीत रोड शो आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांना 7 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली असून पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात होणार्या सुनावणीवर त्यांचा जामीन अवलंबून आहे.

sunita kejriwal campaign for aap candidates lok sabha election 2024 Marathi politics news
Gen Z Loosing Jobs : धक्कादायक! नव्याने पदवीधर झालेल्या तरूणांच्या नोकऱ्या धोक्यात; काय आहे कारण?

महापौर निवडीला एलजीचा नकार

दिल्ली महापौरपदाच्या निवडणुकीवरून आज महापालिकेच्या सभेत आप व भाजपचे नगरसेवक एकमेकांसमोर आले. महापौर शेली ओबेरॉय यांची मुदत संपली असून नव्या महापौराची निवड करावयाची आहे. परंतु नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी महापौर निवडणुकीला परवानगी दिली नाही.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शिफारशीचे पत्र न मिळाल्याने या निवडणुकीला परवानगी देता येणार नाही, असा दावा सक्सेना यांनी केला आहे. आज सभागृहात आप व काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपच्या विरोधात घोषणा दिल्या. तर भाजपच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तरात घोषणा देण्यास सुरूवात केल्याने काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता.

sunita kejriwal campaign for aap candidates lok sabha election 2024 Marathi politics news
मोठी ब्रेकिंग! आबा कांबळे खून खटला प्रकरण; गामा पैलवानासह सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com