Video : शक्तिमानलाही बसला एनआरसीचा फटका

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

सुरपरहिरो समाजाची मदत करण्यासाठी इकडून-तिकडे उडताना, फिरताना दिसतात. सगळ्याच देशांमध्ये फिरत असल्याने त्यांच्याकडे नागरिकत्वाची कागदपत्रे नाहीत. या सगळ्याचा फटका आपला लाडका सुपरहिरो 'शक्तिमान'लाही बसलेला दिसतोय. कसा काय?

एनआरसीविरोधात अवघ्या देशात संतापाची लाट पसरलेली असताना त्याचा फटका आता सुपरहिरोंनाही बसताना दिसत आहेत. सुरपरहिरो समाजाची मदत करण्यासाठी इकडून-तिकडे उडताना, फिरताना दिसतात. सगळ्याच देशांमध्ये फिरत असल्याने त्यांच्याकडे नागरिकत्वाची कागदपत्रे नाहीत. या सगळ्याचा फटका आपला लाडका सुपरहिरो 'शक्तिमान'लाही बसलेला दिसतोय. कसा काय?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शक्तिमानचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. एनआरसी आणि सीएएचा फटका शक्तिमानलाही बसल्याचा या व्हिडिओतून दिसतंय. या व्हिडिओत शक्तिमानला दोन पोलिसांनी पकडलंय. यात शक्तिमान म्हणतोय, 'राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करायचा अधिकार देशातल्या प्रत्येक नागरिकाचा आहे.' यावर एक पोलिस म्हणतो की, 'नागरिकत्त्वाची भाषा करतोयस, जन्माचा दाखला आहे का, कोणत्या शहरात जन्म झालाय तुझा, कुठे शिक्षण झालंय तुझं, शाळेचा दाखला कुठंय' अशा प्रश्नांमुळे शक्तिमान गोंधळून जातो, त्याला पुढे काय करावे कळत नाही. नागरिकत्त्वाचे कागदपत्र मागितल्याने तोही गोंधळून गेलाय.

'वादग्रस्त पुस्तकाशी संबंध नाही'; भाजपचे 'हात वर', तर लेखकाचा माफीनामा 

शक्तिमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शक्तिमानसारखा सुपरहिरो देखील एनआरसीमुळे अडचणीत आलाय अशा आशयाचे मेसेज देखील व्हायरल होत आहेत. मुकेश खन्नाने साकारलेल्या शक्तिमानने अनेक दशकं लहान मुलांच्या मनावर राज्य केलं. त्याच्या प्रत्येक एपिसोडमधून तो काहीतरी सामाजिक संदेश देत असे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: super hero Shaktiman also stuck in NRC Documentation