'पाकिस्तानशी चर्चा करण्याच्या आमच्या भूमिकेला समर्थन' 

'पाकिस्तानशी चर्चा करण्याच्या आमच्या भूमिकेला समर्थन' 

श्रीनगर : पाकिस्तानशी चर्चा करावी, या आपल्या भूमिकेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी काढलेल्या संयुक्त निवेदनाने समर्थन मिळाले असल्याचे जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी गुरुवारी सांगितले.

भारत व पाकिस्तानमध्ये चर्चा होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करावे, असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात व्यक्त केलेले विचार या दोन्ही देशांमधील सध्याच्या तणावाच्या वातावरणात स्वागतार्ह आहे. युद्धासाठी दबाब आणणाऱ्यांना यातून योग्य संदेश मिळाला आहे. तसेच, दोन्ही देशांत गुंतवणुकीची ग्वाही सलमान यांनी दिली आहे. यामुळे सर्वांना आनंदी ठेवण्याची कला त्यांना अवगत असल्याचे दिसते, असे ट्विट मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.

मुफ्ती म्हणाल्या की, भारत - पाकिस्तानमधील सशस्त्र लढ्याबद्दल सावधगिरी बाळगण्याचा इशारा आज मी दिला असून, त्यावर एवढा वाद का उफाळला, हे मला समजत नाही. कोणीही अर्धवट डोक्‍याची व्यक्ती दोन देशांमध्ये युद्ध करण्याचा सल्ला देऊ शकत नाही. विशेषतः जेव्हा दोन्ही देश अण्वस्त्र असतील त्या वेळी. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील सूत्रसंचालक युद्धासाठी प्रोत्साहन देत आहे. माझा त्यांना सल्ला आहे, की त्यांनी गाशा गुंडाळून सीमेवरील आपल्या लष्करात भरती व्हावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com