राहुल गांधींविरोधातील मानहानीच्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi And RSS

राहुल गांधींविरोधातील मानहानीच्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधातील मानहानीच्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता हे प्रकरण ८ सप्टेंबरला सुनावणीसाठी घेतले जाणार आहे. राहुल गांधी यांच्या 2014 मधील भाषणाचा उतारा त्यांच्याविरुद्धच्या गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यात पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याची मागणी फेटाळण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला याचिकाकर्त्याने आव्हान दिले आहे.

हेही वाचा: ऋषीपंचमीचा खगोलशास्त्राशी काय आहे संबंध?

20 सप्टेंबर 2021 रोजी, मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पदाधिकारी राजेश कुंटे यांची याचिका फेटाळून लावली, ज्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 2014 मधील भाषणाचा उतारा त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यात पुरावा म्हणून होता. या भाषणात त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येसाठी आरएसएस जबाबदार असल्याचं म्हटलं होतं.

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

सप्टेंबर 2018 मध्ये भिवंडी दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देत कुंटे यांनी 2019 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र असे आरोपपत्र पुरावा म्हणून स्वीकारण्याची विनंती दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या एकल खंडपीठाने कुंटे यांची याचिका फेटाळून लावली. या भाषणावरून कुंटे यांनी 2014 मध्ये राहुल गांधी यांच्यावर फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता.

हेही वाचा: मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

कुंटे यांच्या याचिकेनुसार, गांधींनी 6 मार्च 2014 रोजी भिवंडीतील निवडणूक रॅलीत भाषण केले होते जिथे त्यांनी कथितपणे म्हटले होते की महात्मा गांधींची हत्या आरएसएसच्या लोकांनी केली होती. यानंतर संघाच्या भिवंडी विभागाचे सचिव कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Web Title: Supreme Court Adjourned Hearing On Contempt Case Against Rahul Gandhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..