Supreme Court : २२ वर्षे खटला चालला, तरी आरोपी तुरुंगाबाहेर! सर्वोच्च न्यायालय हायकोर्टावर संतापले; आता थेट आत्मसमर्पणाचे आदेश!

Supreme Court Questions Allahabad High Court's Decision in 22-Year-Old Case: २२ वर्षांच्या खटल्यात आरोपींना दिलेल्या दिलाशावर सर्वोच्च न्यायालय नाराज; दुसरीकडे नंदलाल राय यांच्या दोषसिद्धीला अलाहाबाद हायकोर्टाची स्थगिती.
Supreme Court
Supreme Courtesakal
Updated on: 

एका गंभीर शारीरिक इजा प्रकरणात आरोपींना दिलेल्या दिलाशावर सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. खटल्याला २२ वर्षे लागल्याच्या कारणावरून आरोपींना तुरुंगवासापासून दिलासा देणे योग्य नसल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. या २००३ मधील प्रकरणात दोन्ही आरोपींना आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले असून, अलाहाबाद उच्च न्यायालयाला प्रकरणाची नव्याने सुनावणी घेण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील पीडित व्यक्तीच्या दोन्ही हातांच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम झाला असून, अद्याप तिच्यावर उपचार सुरू असल्याची बाबही न्यायालयाने अधोरेखित केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com