
सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी हा व्यवसायाने वकील आहे. त्याचे नाव राकेश किशोर आहे. "सनातन धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही." अशी घोषणाही आरोपीने दिल्याची माहिती समोर आली आहे.