

CJI BR Gavai
esakal
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या सुमारे सहा महिन्यांच्या कार्यकाळात देशातील विविध उच्च न्यायालयांसाठी अनुसूचित जाती वर्गातील १० तर ओबीसी प्रवर्गातील ११ अशा एकूण २१ न्यायाधीशांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय अल्पसंख्याक समुदायातील १३ आणि महिला न्यायाधीश म्हणून १५ जणांचीही नियुक्ती करण्यात आली. यामुळे सामाजिकदृष्ट्या वंचित व अल्पसंख्याक घटकांना न्यायव्यवस्थेत मोठे प्रतिनिधित्व मिळाले आहे.