

CJI SuryaKant
esakal
नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर बुधवारी संपूर्ण सर्वोच्च न्यायालय खऱ्या अर्थाने मैदानात उतरले. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने (SCBA) आयोजित केलेल्या वार्षिक दिवस-रात्र क्रिकेट सामन्यात भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील CJI इलेव्हन आणि SCBA इलेव्हन यांच्यात जोरदार लढत झाली. न्यायमूर्ती आणि वकील एकाच मैदानावर आमने-सामने आल्याने स्टेडियममध्ये प्रचंड उत्साह संचारला.