CJI Suryakant
esakal
सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी न्यायाधीशांच्या टिप्पणींवरून निघणाऱ्या निष्कर्षांबाबत चिंता व्यक्त केली आहे. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी केलेल्या प्रश्नांवर आणि निरीक्षणांवरून लोक लगेचच एक ‘नॅरेटिव्ह’ तयार करू लागतात, मात्र आपण अशा चर्चांमुळे किंवा सोशल मीडियावर होणाऱ्या टीकांमुळे प्रभावित होत नाही त्यांनी म्हटलं आहे. आपल्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.