CJI Suryakant
esakal
देश
"नियम सर्वांसाठी समान..."; खचाखच भरलेल्या कोर्टरूममध्ये CJI Suryakant वकिलांवर संतापले, दिला सडेतोड संदेश
Supreme Court Discipline | सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा ठाम इशारा; वरिष्ठ वकिलांना तोंडी उल्लेख बंद, नियम सर्वांसाठी समान असल्याचा सर्वोच्च न्यायालयातून स्पष्ट संदेश
सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच न्यायालयीन शिस्तीला प्राधान्य दिले आहे. माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी गेल्यावर्षी जारी केलेल्या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करीत त्यांनी वरिष्ठ वकिलांनाही तोंडी उल्लेख करण्यास मज्जाव केला आहे. शुक्रवारी खचाखच भरलेल्या न्यायालय कक्षात त्यांनी वकिलांना थेट सुनावले की, नियम सर्वांसाठी समान आहेत आणि त्यात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.

