

Sex Work by Consenting Adults Not Illegal: Supreme Court
Esakal
सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना इशारा देत वेश्याव्यवसाय करणाऱ्यांबाबत म्हटलं की, जर कोणीही सज्ञान व्यक्ती इच्छेनं वेश्याव्यवसाय करत असेल तर त्याला गुन्हा म्हणता येणार नाही. अशा महिलांना अटक करण्याची आणि छळण्याची गरज नाही अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने पोलिसांना बजावलं. जर वेश्याव्यवसाय करण्यासाठी मानवी तस्करी केली जाते किंवा फसवून भाग पाडलं जात असेल तर अशा प्रकरणांमध्ये इमोरल ट्राफिक अॅक्ट लागू होतो असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.