सर्वोच्च न्यायालयाकडून आज निकाल अपेक्षित

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील "महाराजकीय नाट्या'बाबत सर्वोच्च न्यायालयात आज उभय पक्षांकडून सुमारे 80 मिनिटे चाललेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने याबाबत  आज (ता. 26) निर्णय देण्याचे सूचित केले. यामुळे या महानाट्याचा शेवटचा अंक आणखी एक दिवसाने पुढे गेल्याचे चित्र आहे. 

विश्‍वासदर्शक ठराव कधी? 
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील "महाराजकीय नाट्या'बाबत सर्वोच्च न्यायालयात आज उभय पक्षांकडून सुमारे 80 मिनिटे चाललेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने याबाबत  आज (ता. 26) निर्णय देण्याचे सूचित केले. यामुळे या महानाट्याचा शेवटचा अंक आणखी एक दिवसाने पुढे गेल्याचे चित्र आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देता येत नसल्याचा युक्तिवाद भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे करण्यात आला आणि 30 नोव्हेंबरची बहुमत चाचणीची तारीख कायम राखण्याची बाजू मांडण्यात आली. तर, महाआघाडीच्या वतीने, सभागृहातील बहुमत चाचणी हा एकमेव निकष असून, पुढील चोवीस तासांत त्याद्वारे निर्णय केला जावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने रविवारच्या (ता. 24) सुनावणीत राज्यपालांनी फडणवीस यांना सरकारस्थापनेसाठी दिलेले निमंत्रण, सरकारस्थापनेसाठी आवश्‍यक त्या बहुमताचे फडणवीस यांचे दाव्याचे पत्र व अजित पवार यांचे पाठिंब्याचे पत्र, ही तीन कागदपत्रे सादर करण्याचा आदेश दिला होता. ती आज सादर करण्यात आली. भाजप व फडणवीस यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी राज्यपालांनी या सर्व पत्रांच्या आधारेच फडणवीस यांना सरकारस्थापनेची संधी दिल्याचे आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिल्याचे सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर उद्या (ता. 26) यावर निकाल देण्याचे सूचित केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Supreme Court decision expected today