राहुल गांधींनी बोलताना काळजी घ्यावी; राफेल प्रकरणी सरकारला दिलासा

वृत्तसंस्था
Thursday, 14 November 2019

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाचसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणी आज (गुरुवार) याचिका फेटाळली आहे. राफेल विमानांच्या 58 हजार कोटी रुपयांच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 14 डिसेंबर 2018 रोजी निर्णय दिला होता. यानुसार विमानखरेदीचा करार कायम ठेवण्यात आला होता.

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील मोठा दिलासा देत या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका फेटाळली आहे. तसेच न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भविष्यात या प्रकरणी काळजीपूर्वक बोलावे असेही आदेश दिले आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाचसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणी आज (गुरुवार) याचिका फेटाळली आहे. राफेल विमानांच्या 58 हजार कोटी रुपयांच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 14 डिसेंबर 2018 रोजी निर्णय दिला होता. यानुसार विमानखरेदीचा करार कायम ठेवण्यात आला होता. यानंतर या निकालावर फेरविचार याचिका दाखल केली होती. तसेच भाजप नेत्या मिनाक्षी लेखी यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतरही राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है असे म्हणत मोदींवर टीका केल्याप्रकरणी याचिका दाखल केली होती. यावरून न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले आहे.

छः महीने दिए हैं, बनाओ भाई सरकार!; अमित शहांचे उघड आव्हान

राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या निकालाबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांमध्ये केलेली टिप्पणी ही मूळ निकालाशी फारकत घेणारी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही म्हटले होते. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'अनिल अंबानींचा मध्यस्थ,' अशी खिल्ली उडवताना मोदींनी गोपनीयता कायद्याचे उल्लंघन केल्याची तोफ डागली होती. या प्रकरणी राहुल गांधींनी मागितलेली माफीही न्यायालयाने ग्राह्य धरली आहे. न्यायालयाने आज या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाच्या निर्णयांवर बोलताना विचार करून बोलावे असे राहुल गांधींना म्हटले आहे. तसेच या खरेदी व्यवहाराची चौकशीची गरज नसल्याचेही म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court dismisses Rafale review pleas & closes the case after Rahul Gandhi apology