

सर्वोच्च न्यायालयाने पोटगीच्या प्रकरणात दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालामुळे आता डीएनए चाचणी ही निर्णायक ठरू शकते. जर चाचणीत एखाद्या पुरुषाची मुलाशी जैविक संबंध नसल्याचे स्पष्ट झाले, तर त्याला मुलाच्या पालनपोषणासाठी पोटगी देण्याचा आदेश देणे शक्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हा निर्णय विवाहादरम्यान जन्मलेल्या मुलाच्या प्रकरणातही लागू राहील.