Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

Supreme Court Challenge by Former Judge Deepak Verma : राजस्थान उच्च न्यायालयाच्या लवादावरील आक्षेप आणि शुल्क कपातीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश दीपक वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
Former Supreme Court Judge Challenges Rajasthan High Court Order

Former Supreme Court Judge Challenges Rajasthan High Court Order

esakal

Updated on

राजस्थान उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायधीशांच्या अध्यक्षतेखालील लवादाच्या कामकाजावर आक्षेप घेत ‘सुस्त’ पद्धतीने कार्यवाही सुरू असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच लवादाचे शुल्क कमी करण्याचे निर्देश दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती दीपक वर्मा यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवर सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com