
सतरा गुन्ह्यांतील आरोपी HIV बाधित; सुप्रीम कोर्टाने दिला 'हा' निर्णय
एकूण सतरा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोपी असलेला एक व्यक्ती एचआयव्ही (HIV) बाधित असल्याचे आणि त्याची प्रतिकारशक्ती खूपच कमी असल्याचे बाब समोर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलाय. खंडपीठाने एचआयव्हीचा वैद्यकीय रिपोर्ट आल्यानंतर आरोपीला जामीन देण्याचा निर्णय घेतलाय. (Supreme Court Grants Bail To Accused Suffering From HIV)
हेही वाचा: 8 वर्षांच्या मुलीवर 62 वर्षाच्या वृद्धानं केला बलात्कार
आरोपीच्या श्वास घेण्यास त्रास होत असून त्याला आधाराशिवाय चालता येत नाही. प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्याला वारंवार संसर्ग होण्याचा धोका होता.अशा रुग्णाला नियमित उपचार आणि देखरेखीची आवश्यकता असते.
हेही वाचा: रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला फटका, S-400 क्षेपणास्त्राची डिलीव्हरी लांबली
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, "अर्जदाराला एचआयव्हीची बाधा आहे आणि त्याची प्रतिकारशक्ती खूपच कमी आहे त्यामुळे तो जामीन घेण्यास पात्र आहे."
सर्वोच्च न्यायालयाने संबंधित न्यायालयाला (राजस्थान उच्च न्यायालय) ह्यूमन इम्यूनो डेफिसिएंसी वायरस कलम 34(2) और एक्वायर्ड इम्यून डेफिसिएंसी सिंड्रोम (रोकथाम और नियंत्रण) एक्ट, 2017 अंतर्गत याचिकाकर्त्यांच्या अपीलांचा लवकर निपटारा करण्यासाठी विविध अटींचा लाभ देण्याचे निर्देश दिले. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, आरोपींविरुद्ध अनेक खटले प्रलंबित आहेत.याचिकाकर्त्याचे अपील लवकरात लवकर सुनावणीसाठी आणि निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयाने योग्य ती पावले उचलावीत.
हेही वाचा: 'मुसलमान देशासाठी प्राण पणाला लावतील; पण जेव्हा त्यांच्यावर..'
आरोपीवर राजस्थानच्या विविध पोलीस ठाण्यात 17 गुन्हे दाखल आहेत. राजस्थान उच्च न्यायालयाने आरोपीला दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याचे अपील फेटाळून लावले होते. त्यानंतर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली,तेव्हा तिथे त्याला जामीन मिळाला.
Web Title: Supreme Court Grants Bail To Accused Who Is Suffering From Hiv
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..