esakal | न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण दोषी; शिक्षा होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Supreme Court, prashant bhushan

प्रशांत भूषण यांनी न्यायालयाच्या मूख्य न्यायधीशांचा अपमान हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान नाही. तसेच यामुळे न्यायालयाचा कुठल्याही प्रकार अपमान झालेला नाही. जे काही ट्विट केलेले आहे, त्यामध्ये लोकशाही संपवण्याचा परवानगी देण्याविषयी भाष्य केलेले आहे आणि तो एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असून अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा वापर करून ते ट्विट करण्यात आले असल्याचेही भूषण यांनी म्हटले आहे.

न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण दोषी; शिक्षा होणार?

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना दोषी ठरविण्यात आले आहे.  सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांनी केलेल्या दोन ट्विटवरून त्यांनी दोषी ठरविण्यात आले आहे. न्यायमूर्ती अरूण मिश्रा, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि  न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. 20 ऑगस्ट रोजी आता त्यांना काय शिक्षा होणार यावर पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणात 5 ऑगस्टला सर्वोच्च न्यायलयाने याप्रकरणी आलेल्या याचिकाही रद्द केल्या असून याचिकावर सुनवाई करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. प्रशांत भूषण यांनी केलेल्या ट्वीट्सबद्दल सुप्रीम कोर्टाने सुओ मोटो म्हणजेच स्वतःहून तक्रार दाखल केली होती. त्यांच्या या ट्वीटची दखल घेऊन त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता. न्यायालयाने या प्रकरणी प्रशांत भूषण यांनी दिलेली सफाई अमान्य केली आहे.

मोठी बातमी : भारतीयांचा यूके, अमेरिका, कॅनडा आणि युएईला प्रवास शक्य

प्रशांत भूषण काय म्हणाले?

प्रशांत भूषण यांनी न्यायालयाच्या मूख्य न्यायधीशांचा अपमान हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान नाही. तसेच यामुळे न्यायालयाचा कुठल्याही प्रकार अपमान झालेला नाही. जे काही ट्विट केलेले आहे, त्यामध्ये लोकशाही संपवण्याचा परवानगी देण्याविषयी भाष्य केलेले आहे आणि तो एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असून अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा वापर करून ते ट्विट करण्यात आले असल्याचेही भूषण यांनी म्हटले आहे. प्रथम दर्शनी आम्हाला न्यायालयाचा अपमान झाला आहे असं वाटतं. असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत न्यायालयावर भाष्य केलं होतं असं शपथपत्र प्रशांत भूषण यांनी दिलं होतं.

हे वाचा - रशियाची कोरोना लशीची घाई ठरू शकते धोकादायक

प्रशांत भूषण यांना होऊ शकते सहा महिन्याची शिक्षा

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी, 1971च्या कायद्यानुसार प्रशांत भूषण यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते आणि त्यांना न्यायालय या कायद्याच्या आधारे सहा महिन्यापर्यंत शिक्षा देऊ शकते. परंतु, जर प्रशांत भूषण यांनी न्यायालयाची माफी मागितली तर न्यायालय भूषण यांना माफीही देऊ शकते. सहा महिन्याच्या शिक्षेऐवजी न्यायालय भूषण यांना २ हजार रुपयांचा दंडही ठोठावू शकते किंवा सहा महिने शिक्षा आणि २ हजार रुपये दंड अशी दुहेरी शिक्षाही होऊ शकते.

loading image