रशियाची कोरोना लशीची घाई ठरू शकते धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

अमेरिकेपासून जर्मनीपर्यंत रशियाचं वॅक्सिन Sputnik-V वर शंका व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा रशियाकडे काही पुरावे मागितले आहेत.

नवी दिल्ली - रशियाने कोरोना व्हॅक्सिन(covid 19 vaccine)तयार केल्याचा दावा केल्यानंतर जगभरात त्यावरून वाद सुरू झाले. अमेरिकेपासून जर्मनीपर्यंत रशियाचं व्हॅक्सिन Sputnik-V वर शंका व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा रशियाकडे काही पुरावे मागितले आहेत. दरम्यान व्हॅक्सिन तयार करण्यासाठी सुरु झालेल्या घाईबाबत तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानुसार तिसऱ्या टप्प्यातील डेटा विश्लेषण होत नाही तोपर्यंत व्हॅक्सिनला सुरक्षित म्हणता येणार नाही. रशियाने म्हटलं की, त्यांना 20 देशांमधून कोट्यवधी डोसची ऑर्डर मिळाली आहे. 

ओटागो युनिव्हर्सिटीच्या व्हायरॉलॉजी विभागाचे तज्ज्ञ प्राध्यापक डेव्हिड मर्डोक यांनी ऑक्सफर्डच्या कोरोना व्हॅक्सिनबाबत प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, ज्या व्हॅक्सिनच्या सर्वात पहिल्या आणि प्रभाव असण्याची चर्चा केली जात आहे त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पुढच्या वर्षी पहिल्या काही महिन्यात संपतील. सर्वात महत्वाचं आव्हान म्हणजे व्हॅक्सिनच्या सुरक्षेबाबत तडजोड करता येणार नाही.

हे वाचा - रशियाचा हट्टीपणा; संशयास्पद कोरोना लशीचं उत्पादन सुरू करणार

मर्डोक यांनी म्हटलं की, तुम्ही अशी गोष्ट तयार करत आहात ज्यासाठी पेपरवर्कची गरज आहे. सर्व अभ्यास पूर्ण झालात तर आपण व्हॅक्सिन आणू शकतो. तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. कोणत्याही इतर व्हॅक्सिनप्रमाणे आपण याचीही सुरक्षा तपासली पाहिजे. 

सध्या ज्या प्रमाणे काही देश कोरोना व्हॅक्सिनच्या तयारीला लागले आहेत त्यावरून तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ऑकलंड विद्यापीठातील प्रॉध्यापक निकी टर्नर यांनी म्हटलं की, रशियाचं व्हॅक्सिन रजिस्टर केलं आहे पण त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलबाबत अनेक शंका आहेत. हा मोठा धोका असून आंतरराष्ट्रीय बाजारात असं व्हॅक्सिन आहे ज्याला हात लावणंही मला धोकादायक वाटतं. सर्वात महत्वाचं म्हणजे संशोधकांनी त्यांचा डेटा पब्लिश करावा आणि तो पारदर्शक असावा. लोकांमध्ये व्हॅक्सिन सुरक्षित असल्याची भावना निर्माण व्हायला हवी. 

हे वाचा - रशियाची कोरोनावरील लस लाखो लोकांना देणं घातक; वाचा जगभरातील देशांच्या प्रतिक्रिया

रशियाच्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारे डेली मेलने वृत्त देत व्हॅक्सिनवर प्रश्न उपस्थित केले होते. यानुसार रशियाच्या कोरोना व्हॅक्सिनचे दुष्परिणाम समोर आल्याचं सांगितलं जात आहे. रशियाने फक्त 38 लोकांवर कोरोनाची चाचणी करण्यासाठी मंजुरी दिल्याचं डेली मेलने म्हटलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 vaccine in hurry will dangerous or side effect on health

Tags
टॉपिकस
Topic Tags: