

supreme court
esakal
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता न्यायालयीन प्रकरणांमध्ये वारंवार स्थगिती मागण्याचा प्रकार संपुष्टात येणार आहे. न्यायालयाने स्थगिती देण्याच्या प्रक्रियेला अधिक कठोर नियम बंधनकारक केले आहेत. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच स्थगितीची विनंती मान्य केली जाईल, असा स्पष्ट संदेश न्यायालयाने दिला आहे.