

Supreme Court
esakal
नवी दिल्ली : देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एका खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला दुसऱ्या खंडपीठाकडून आव्हान देण्याचे आणि जुने निकाल उलथवून टाकण्याचे प्रकार सतत वाढत असल्याने बुधवारी सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने तीव्र चिंता व्यक्त केली. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने हे वर्तन केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेला आणि अधिकाराला धक्का पोहोचवत नसून, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १४१ च्या मूलभूत भावनेलाही हरताळ फासणारे असल्याचे ठामपणे नमूद केले.