
हत्या केल्यानंतर मृतदेहाशी लैंगिक संबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरत नाही, अशी सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केली आहे. एका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने कर्नाटक हायकोर्टाचा आदेश कायम ठेवला आहे. हायकोर्टाने त्या व्यक्तीला बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले होते, परंतु हत्येचा गुन्हा कायम ठेवला होता. या प्रकरणात, सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की नेक्रोफिलिया (Necrophilia) म्हणजेच मृतदेहासोबत लैंगिक संबंध भारतीय दंड संहिता (IPC)मध्ये गुन्हा मानला जात नाही.