

Supreme Court of India delivering a landmark judgment on inter-caste marriage and inheritance rights under a legally valid will.
esakal
मुलीने आंतरजातीय लग्न केल्याने वडिलांनी तिला संपत्तीत हिस्सा देण्यास नकार दिला असून मृत्युपत्रातून तिचे नाव वगळले. जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले तेव्हा न्यायालयानेही उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्टाचे निर्णय रद्द करत मुलीला धक्का दिला. सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की वादीला तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नाही. तसेच मृत्युपत्र लिहिणाऱ्याला त्यांच्या जागी ठेवता येणार नाही असे म्हटले आहे.