Supreme Court: न्यूजक्लिकवरील कारवाईनंतर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिली नोटीस

न्यूजक्लिकचे संस्थापक आणि संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांच्या अटकेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली
supreme court
supreme courtsakal

न्यूजक्लिकचे संस्थापक आणि संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांच्या अटकेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने याप्रकरणी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे.

प्रबीर आणि अमित यांनी 16 ऑक्टोबरला त्यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यापूर्वी, 10 ऑक्टोबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने दोघांनाही 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती, ती कोठडी उद्या (शुक्रवारी) 20 ऑक्टोबर रोजी संपत आहे.

supreme court
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या तरुणाची आत्महत्या

पुरकायस्थ आणि अमित यांच्यावर चीनशी संबंधित कंपन्या आणि संस्थांकडून निधी घेऊन चिनी प्रचाराचा प्रसार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अटकेबाबत सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला होणार आहे.

supreme court
Shivsena: विधानपरिषद आमदार अपात्रता प्रकरणातही दिरंगाई; ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

सीबीआयसह 5 एजन्सी या प्रकरणाचा करत आहेत तपास

सीबीआयसह पाच एजन्सी न्यूजक्लिकच्या विरोधात तपास करत आहेत. प्रथम दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एफआयआर नोंदवला होता. त्याआधी दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभाग या प्रकरणाशी संबंधित वेगवेगळ्या प्रकरणांची चौकशी करत होते. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने न्यूजक्लिक विरुद्ध फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com