

Supreme Court on SIR
esakal
मतदार यादीतून एसआयआर प्रक्रिये अंतर्गत १३ कोटी मतदार वगळल्याच्या प्रकरणी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर सुनावणी सुरू असून सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगासह मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर निवडणूक आयुक्तांनाही नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एसआयआर प्रकरणी दाखल राहुल गांधींच्या याचिकेकेवर संबंधित अधिकाऱ्यांकडून उत्तर मागितलं आहे. यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांचाही समावेश आहे.