
CJI BR Gavai: सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर सर्वच स्तरातून आरोपी वकिलाच्या कृत्याचा निषेध केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश गवई यांना फोन करून माहिती घेतली. दरम्यान, मंगळवारी न्यायालयात सरन्यायाधीश गवई यांनी सुनावणीवेळी सोशल मीडियावर चालणाऱ्या ट्रेंडवरून टिप्पणी केलीय. ते म्हणाले की आज काल लोकांना लगेच वाईट वाटतं. तुमचे अशील नाराज होतात.