

CJI Suryakant
esakal
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने न्यायाधीशांच्या निवृत्तीच्या अगदी जवळच्या काळात घेतले जाणारे निर्णय आणि त्यामागील हेतू याबाबत चिंता व्यक्त केली. मध्य प्रदेशातील एका वरिष्ठ जिल्हा न्यायाधीशाच्या निलंबनाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हे निरीक्षण समोर आले.