'आम्हाला परिस्थितीची जाणीव आहे, पण...'; शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली चिंता

वृत्तसंस्था
Wednesday, 6 January 2021

'शेतकरी आंदोलनाच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही,' असे सरन्यायाधीश म्हणाले.

नवी दिल्ली : कृषी कायद्यांशी संबंधित याचिकेच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आम्हाला परिस्थितीची जाणीव आहे, त्यामुळे चर्चेतून मार्ग काढावा, अशी आमची इच्छा आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांनी म्हटलं आहे.

नवे तीनही कृषी कायदे रद्द करण्याविरोधात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनाविषयी सुप्रीम कोर्टात काय सुरू आहे? याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? असा सवालही सरन्यायाधीशांनी याचिकाकर्ते एम.एल.शर्मा यांना विचारला आहे. यावर शर्मा यांनी सुधारित याचिका दाखल केली आहे, असे म्हटलं आहे. 

ताजमहलसमोर फडकावला भगवा झेंडा, दिले जय श्रीरामचे नारे​

शेतकरी आंदोलनावरील सुनावणी कधी होणार आहे? असे एसजी तुषार मेहता यांना विचारले असता मेहता म्हणाले, अद्याप तारखेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, पण दुसऱ्या प्रकरणांसोबत याची सुनावणी केली जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याला सरन्यायाधीशांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आतापर्यंत कोणताच तोडगा काढण्यात आलेला नाही, त्यामुळे आम्ही अन्य प्रकरणांसोबतच हे प्रकरण समजून घ्यायचे आहे, असे सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. 

आता सर्व याचिकांवर ११ जानेवारीला सुनावणी होणार आहे. सर्व पक्षांची बाजू सोमवारी ऐकून घेतली जाईल. आणि जर अॅटर्नी जनरल यांनी खटला पुढे ढकलण्याची मागणी केली, तर सुनावणी पुढे ढकलली जाईल. या प्रकरणी चर्चेतून तोडगा काढावा, अशी कोर्टाची इच्छा असल्याचे सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. 

Long Kept Secret: इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ज्ञाच्या दाव्यानं उडाली एकच खळबळ​

'शेतकरी आंदोलनाच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही,' असे सरन्यायाधीश म्हणाले. तसेच नजीकच्या काळात दोन्ही पक्ष एका निष्कर्षापर्यंत पोहोचतील, याची शक्यता असल्याचे अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court made statement on Farmers protest over Farm laws