esakal | Long Kept Secret: इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ज्ञाच्या दाव्यानं उडाली एकच खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

tapan misra

इस्रोच्या एका वरिष्ठ शास्त्रज्ज्ञाने आपल्याला तीन वर्षांपूर्वी विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

Long Kept Secret: इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ज्ञाच्या दाव्यानं उडाली एकच खळबळ

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

बंगलुरु- इस्रोच्या एका वरिष्ठ शास्त्रज्ज्ञाने आपल्याला तीन वर्षांपूर्वी विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे. शास्त्रज्ज्ञ तपन मिस्रा यांनी आरोप केलाय की 23 मे 2017 मध्ये बंगळुरुतील इस्रोच्या कार्यालयात प्रमोशन मुलाखतीदरम्यान त्यांना जीवघेणे अर्सेनिक ट्रायऑक्साईड arsenic trioxide देण्यात आले होते. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अटक करा; इराणच्या मागणीमुळे ट्रम्प अडचणीत

डोसा आणि चटणीमध्ये विष मिसळण्यात आले होते, असं तपन मिस्रा म्हणाले आहेत. मिस्रा सध्या इस्रोमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करत आहेत. त्यांनी यापूर्वी अहमदाबादमधील इस्रोच्या Indian Space Research Organisation स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक म्हणून काम पाहिलं आहे. इस्रोमधील एका वरिष्ठ शास्त्रज्ज्ञाच्या दावा केल्याने खळबळ उडाली आहे. 

तपन मिस्रा यांनी 'खूप काळापर्यंत लपवलेलं रहस्य' 'Long Kept Secret' या मथळ्याखाली फेसबुकवर पोस्ट केली आहे. तपन मिस्रा यांनी असाही दावा केलाय की, गृहविभागातील एका सुरक्षा अधिकाऱ्याने त्यांची भेट घेतली आणि अर्सेनिक विषाबद्दल सतर्क केले. त्याने डॉक्टरांनाही उपचारासाठी महत्वाची माहिती पुरवली. 

मुकेश अंबानी यांना दुसरा धक्का; श्रीमंतीला लागले ग्रहण

श्वास घेण्यास त्रास जाणवणे, त्वचा जळणे, फंगल इंफेक्शन यासारख्या आरोग्य समस्या जाणवल्याचं मिस्रा यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी सोशल मीडियावर मेडिकल रिपोर्ट शेअर केला आहे. यात त्यांनी एम्सने त्यांना अर्सेनिक ट्रायऑक्साईड विष दिल्याच्या घटनेला पुष्टी दिल्याचं सांगितलं आहे. मिलिट्री क्षेत्रामध्ये योगदान दिलेल्या आणि महत्त्वपूर्ण माहिती असलेल्या वैज्ञानिकाला हटवण्याचा हा आंतराराष्ट्रीय षडयत्रांचा हा एक भाग असू शकतो, असा आरोप तपन मिस्रा यांनी केलाय.

loading image