

Supreme Court
Esakal
मुस्लिम पुरुषांना एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी देणाऱ्या तरतुदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. पहिल्या पत्नीच्या हयातीत केलेले दुसरे लग्न 'अवैध' आणि 'शिक्षापात्र गुन्हा' घोषित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच, मुस्लिम समुदायातील विवाह आणि वारसाहक्क यांसारख्या बाबींसाठी 'लिंग-निरपेक्ष' कायदे करण्याची मागणीही यात केली आहे.