
Supreme Court on Toll Tax : केरळमधील त्रिशूर येथील ६५ किमी लांबीचा महामार्ग ओलांडण्यासाठी जर १२ तास लागतात, तर प्रवाशाकडून १५० रुपये टोल का आकारला जातोय असा कडक प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) विचारला. मुख्य न्यायाधीश बीआर गवई, न्यायमूर्ती के विनोद चंद्रन आणि न्यायमूर्ती एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने एनएचएआय आणि सवलतीधारक गुरुवायूर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या याचिकांवर सुनावणी करताना ही टिप्पणी केली. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला.